अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आज 5 वाजता पोलीस उपायुक्त मुंडे आझाद मैदान डिव्हिजन यांची भेट घेऊन 1 नोव्हेंबर 2025 रोजी होणारा राज ठाकरे ,उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडून मोर्चा काढला जाणार आहे. तो थांबवण्याबाबत तक्रार दिली आहे. 1 नोव्हेंबरला विरोधकांच्या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे, याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी ते म्हणाले की, "तुम्हाला सांगतो कायद्याच राज्य, राज उद्धव शरद पवार म्हणतात म्हणून गलत काम मुंबईत चालणार नाही. त्यांनी सत्याचा मोर्चा नाही ढोंग्याचा मोर्चा आहे. हा लबाडांचा मोर्चा... इतरांना जसे कायदे लागू असेल त्यांना जो नियम तोच राज उद्धव शरद पवारांच्या मोर्चाला नियम. आझाद मैदान ठरवून दिले आहे उच्च न्यायालयाने, दुसरीकडे मोर्चा काढता येणार नहीं. शरद पवारांच्या या वयात, कृषीमंत्री होते, मुख्यमंत्री होते त्यांना हे उलगडू नये?"
"उद्धव ठाकरेंचा संजूबाबा म्हणाला की बोलून वळवता येत नसते, सुप्रीम कोर्टाची केस तिकडे वळू असे म्हणतो. तुमच्यात निवडणूक लढायची ताकद नाही म्हणून तुम्हीं हे करता. शरद पवार संजूबाबा बोलायचे निवडणुका पाहिजे,राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनांव रोक के दिखाव. नियमात मोर्चा असेल तर परवानगी द्यावी, अन्यथा नाही. हे दळभद्री उद्या मारणार म्हणून आज गौऱ्या रचताय. जरांगेच्या वेळी न्यायालयाने सांगितले होते की मोर्चा ठरवून दिलेल्या जागीच केले पाहिजे. ते जर जास्त dur dur करू लागले तर मुसक्या आवळा. सुमार दर्जाचा व्यंगचित्रकार उद्धव. हा नालायक मोर्चा याला पाठ फिरवा."