गुणरत्न सदावर्ते यांनी आज देवेन भारती यांची भेट घेतली. त्यादरम्यान माध्यमांशी बोलताना ते राज ठाकरेंवर बरसले आहेत. सध्या राज्यभरात मराठी भाषेवरुन मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. नुकतेच मनसेने एका बॅंकमध्ये तसेच एका बिल्डिंगच्या वॉचमनला मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह केला होता. यावरुन गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांच्यावरही कारवाई करावी
"राज ठाकरे यांचे कार्यकर्ते जे करत आहेत त्याची तक्रार केली आहे. विशेष पोलिस अधिकारी म्हणाले आहेत की, उद्या पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जाणार आहे. जो कोणी गुंड गर्दी करत आहेत ते उद्या पासून होणार नाही. ज्यांच्यावर कार्यकर्ते हल्ला करत आहे ते तक्रार करत नाहीत. राज ठाकरे यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 2008 मध्येही मनसेने अस केलं होत. जे कोणी चुकीचं करत असतील त्यांच्यावर कारवाही होईल अस सांगितलं आहे. गुजराती असो हिंदी असो मराठी असो इंग्रजी असो.. मेरी मर्जी...! राज ठाकरे यांचे कार्यकर्ते जिथे लोकांचा अपमान करत असतील तिथे सन्मानित करू", असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.