Gunratna Sadavarte Team Lokshahi
ताज्या बातम्या

Breaking : गुणरत्न सदावर्तेंविरोधात कोल्हापुरातही गुन्हा दाखल

सदावर्तेंच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Published by : Sudhir Kakde

कोल्हापूर : ऍड.गुणरत्न सदावर्तेंविरोधात (Gunratna Sadavarte) कोल्हापूरातही गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापुरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) समन्वयक दिलीप पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात भा.दं.विच्या कलम १५३ अ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा समाज आणि मागासवर्गीय समाजात वाद होऊन दंगे घडावेत असं चिथावणीखोर आणि भडकावू वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहेत.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण प्रकरणात माध्यमांशी बोलताना काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर भावना दुखावल्याने काही लोकांनी सदावर्तेंविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणात आता पुण्याातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात देखील सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता सदावर्तेंना सातारा पोलीसांच्या कोठडीनंतर पुणे पोलीस ताब्यात घेतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा