Gyanvapi Masjid Team Lokshahi
ताज्या बातम्या

'शिवलिंग सापडलं ही अफवा', मुस्लिम पक्षाचा दावा; ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी सोमवारी

Gyanvapi Controversy : न्यायालयात युक्तिवाद करताना मुस्लिम पक्षाने सांगितलं की, शिवलिंग मिळण्याची चर्चा ही अफवा आहे.

Published by : Sudhir Kakde

ज्ञानवापी आणि शृंगार गौरी प्रकरणाची सुनावणी गुरुवारी दुपारी जिल्हा न्यायाधीश अजयकुमार विश्वेश यांच्या न्यायालयात झाली. मुस्लीम बाजूच्या मागणीवरून न्यायालयाने प्रथम खटल्याची कायदेशीरता जाणून घेत त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. मुस्लिम पक्षाने शिवलिंग मिळाल्याची चर्चा अफवा असल्याचं म्हटलं आहे. (Gyanvapi Controversy)

मुस्लीम बाजूने प्रार्थनास्थळ कायदा, 1991 चे उल्लंघन करून ज्ञानवापीबाबत दाखल केलेला अर्ज फेटाळण्याची मागणीही केली. सध्या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयात युक्तिवाद करताना मुस्लिम पक्षाने सांगितलं की, शिवलिंग मिळण्याची चर्चा ही अफवा आहे. यातून जनतेच्या भावना भडकावल्या जात आहेत. मुस्लीम पक्षातर्फे वकील अभयनाथ यादव यांनी सांगितलं की, मशिदीत शिवलिंग सापडल्याचं सांगून लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते म्हणाले की, 1991 च्या प्रार्थना स्थळ कायद्यानुसार हे प्रकरण चालवण्यायोग्य नाही.

दरम्यान, यापूर्वी मुस्लिम पक्षाने सांगितलं की, या कायद्यानुसार 1947 पर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळाचा दर्जा बदलता येणार नाही. त्यामुळे हे प्रकरण त्या कायद्यांतर्गत सुनावणीसाठी ठेवता येणार नाही. 1991 च्या धार्मिक स्थळे (विशेष तरतुदी) कायद्याच्या संदर्भात या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होऊ शकत नाही, असा युक्तिवाद मशीद व्यवस्थापन समितीच्या वतीने न्यायालयात करण्यात आला आहे. या संदर्भात नागरी प्रक्रिया संहितेच्या आदेश 07 नियम 11 अंतर्गत अर्ज करण्यात आला होता. संबंधित कायद्यात 15 ऑगस्ट 1947 प्रमाणे धार्मिक स्थळांचे स्वरूप कायम ठेवण्याची तरतूद आहे.

तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जिल्हा न्यायाधीश डॉ. अजयकुमार विश्वेश यांच्या न्यायालयात गेल्या सोमवारी सुनावणी सुरू झाली. सुमारे 45 मिनिटे सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली. मंगळवारी, न्यायालयाने निर्णय दिला की, प्रथम मुस्लिम बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला जाईल आणि केस कायम ठेवण्यायोग्य आहे की नाही हे ठरवलं जाईल. सुप्रीम कोर्टाने आदेश 07 नियम 11 शी संबंधित अर्ज म्हणजेच केस कायम ठेवण्यायोग्य आहे की नाही, यावर प्राधान्याने सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल