कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरे झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याहस्ते पंढरपुरात विठुरायाची शासकीय महापूजा करण्यात आली. राज्यावरील आलेलं नैसर्गिक अरिष्ट दूर होऊ दे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विठुरायाला साकडं घातलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी त्या म्हणाल्या की, "कार्तिकी आषाढीची आज आम्हाला पुजा करायला मिळाली. हे माझं सौभाग्य आहे. बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे ही विठ्ठला चरणी मागणं मागितलं आहे."