happy republic day 2026 wishes and quotes in marathi 
ताज्या बातम्या

Happy Republic Day 2026 Wishes: प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठीत पाठवा 'या' खास शुभेच्छा !

26 जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची जाणीव जागवणारा आहे. याच दिवशी भारताला संविधान मिळाले आणि लोकशाही गणराज्य म्हणून देशाची ओळख निर्माण झाली.

Published by : Riddhi Vanne

26 जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची जाणीव जागवणारा आहे. याच दिवशी भारताला संविधान मिळाले आणि लोकशाही गणराज्य म्हणून देशाची ओळख निर्माण झाली. हा दिवस स्वातंत्र्य, समानता आणि एकतेची आठवण करून देतो.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाविषयीचा अभिमान आणि आदर व्यक्त करण्याची ही योग्य वेळ आहे. मित्र, नातेवाईक आणि आप्तस्वकीयांना शुभेच्छा पाठवून हा आनंद द्विगुणित करता येतो. एकत्र येऊन तिरंग्याचा सन्मान करत, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊया.

उत्सव तीन रंगांचा,

अभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या चरणी,

ज्यांनी भारत देश घडवला.

संविधानाने दिली आम्हाला ओळख,

संविधानाने दिला आम्हाला मान

प्रजासत्ताक दिन २०२६ च्या शुभेच्छा !

सलाम करा या तिरंग्याला जी तुमची शान आहे,

मान नेहमी वर उंच ठेवा जो पर्यंत प्राण आहे,

जय हिन्द, जय भारत,

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवत,

एकता, समता आणि बंधुता जपूया,

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशासाठी,

काहीतरी सकारात्मक करण्याचा संकल्प करूया.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा