ताज्या बातम्या

लोणंद शहरात 321 फूट लांब तिरंग्यासह भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव " हर घर तिरंगा" उपक्रम जनजागृती फेरी

Published by : Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणंद शहरातून 321 फूट लांबीच्या तिरंग्यासह भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव " हर घर तिरंगा" उपक्रम जनजागृती फेरी काढण्यात आली. एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी मित्र समुहाच्या वतिने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. लोणंदच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमीक शाळेतील विध्यार्थी,शिक्षक,एनसीसी,आरएसपी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी या रॅलीत सहभाग घेतला.

भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत लोणंद शहरातून तब्बल 321 फूट लांबीच्या तिरंग्यासह भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव " हर घर तिरंगा" उपक्रम जन जागृती फेरी काढण्यात आली

एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांनी 321 फूट तिरंगा उपलब्ध करून देत त्याचे व्यवस्थापन सादरीकर करण्यासाठी परिश्रम घेतले. लोणंद शहरातून भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये 500 विद्यार्थी-विद्यार्थीनीनी सहभाग घेतला. संपूर्ण शहरातुन वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा आणि मालोजीराजे विद्यालयाच्या बॅन्ड पथकाने नागरिकांचे लक्ष वेधले होते.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल