Hardik Pandya  
ताज्या बातम्या

Hardik Pandya : हार्दिक पंड्या टी-२० वर्ल्डकपमधून होणार बाहेर? BCCI ने ठेवली 'ही' अट

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात टीम इंडियाचा स्क्वॉड घोषित केला जाऊ शकतो.

Published by : Naresh Shende

आगामी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड लवकरच होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात टीम इंडियाचा स्क्वॉड घोषित केला जाऊ शकतो. बीसीसीआय १५ खेळाडूंची घोषणा करणार आहे. अशातच चाहत्यांनाही संघाच्या घोषणेबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी निवड करण्यात येणाऱ्या भारतीय संघात हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयपीएलमध्ये पंड्याची कामगिरी चमकदार राहिली नाहीय. अशातच आता अनेक असे खेळाडू आहेत, ज्यांनी अप्रतिम कामगिरी करत बासीसीआयसमोर दावेदारी पक्की केली आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या जागेबाबत टांगती तलवार उभी ठाकली आहे.

रिपोर्टनुसार, बीसीसीआयने राहुल द्रविड आणि रोहित शर्माशी टीमच्या निवडीबाबत मिटिंग केली. ज्यामध्ये हार्दिकच्या जागेबाबत चर्चा करण्यात आली. हार्दिकला संघात यायचं असेल, तर नेहमीप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल, अशाप्रकारचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचं समजते. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, पंड्यावर निवडकर्त्यांची नजर असणार आहे. आयपीएलच्या सामन्यांमध्ये नियमितपणे गोलंदाजी केल्यावर हार्दिक पंड्याची टी-२० वर्ल्डकप टीममध्ये निवड होऊ शकते. परंतु, या आयपीएलमध्ये हार्दिक पंड्या नियमितपणे गोलंदाजी करत नाहीय. त्यामुळे असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यंदाच्या आयपीएल हंगामात हार्दिक पंड्याने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली नाहीय. पंड्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांपैकी फक्त चार सामन्यांमध्येच गोलंदाजी केली आहे. गुजरात टायटन्सच्या विरोधात ३ आणि सनरायजर्स हैदराबाद विरोधात ४ षटकांची गोलंदाजी पंड्याने केली होती. त्यानंतर पुढील दोन सामन्यांत पंड्याने गोलंदाजी केली नाही. तसचं आरसीबीविरोधात पंड्याने एक षटक, तर चेन्नई विरोधात पंड्याने तीन षटक टाकले होते. सीएसकेसाठी दमदार कामगिरी करणारे शिवम दुबेनं टी-२० वर्ल्डकप संघासाठी दावेदार असल्याचं सिद्ध केलंय. परागनेही या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे हार्दिकची जागा पक्की मानली जात नाहीय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक