ताज्या बातम्या

Hari Narke Passed Away: ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यावरून मुंबईला एका बैठकीला जात असताना सकाळी हार्टअ‍ॅटक आला. त्यानंतर वांद्रे येथील एशिअन हार्ट हाॅस्पिटल येथे केले होते दाखल.

मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी काम केले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून काम पाहिलं.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

सोशल मीडियावर ते सतत सक्रीय होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, हे त्यांचे पुस्तके प्रसिद्ध आहे. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने  26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन  हरी नरके यांनी केले होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा