उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट झाली. आज बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या कारखान्यासाठी ब वर्गातून मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार एकत्र आल्याच पाहायला मिळालं.
यावेळी मतदान केंद्रावर हर्षवर्धन पाटील यांची अजित पवार यांच्यासोबत भेट झाली. या भेटीत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या संवादातून मिश्किल टोलेबाजी झाल्याचेही पाहायला मिळालं आहे.