आज पुण्यात 'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे आयोजित 'पुणे संवाद 2025' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'पुणे संवाद 2025' या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा झाली. या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील सहभागी झाले होते. त्यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की,"एखाद्या विरोधीपक्षाच्या नेत्याने जर एखादा मुद्दा मांडला आणि तो जर आम्हाला क्लिक झाला की, तो मुद्दा चांगला आहे. कदाचित आपण हा कायद्यामध्ये देखील रुपांतर करु शकतो. असे काही विषय आहेत".
"पंरतू विरोधकांनी मांडलेल्या एखाद्या अशासकीय ठरावाच्या माध्यमांतून सुद्धा आम्ही राज्याचे कायदे केलेले आहेत, म्हणजे ती प्रगल्भदा असली पाहिजे. त्यामुळे होत काय की, जो पॉलिटीकली ऑरा असतो तो मेन्टेन करायला पाहिजे. आज नाही म्हटलं तरी जसं रुपाली ताई म्हणाल्यी की, काम कुठली कधी कशी करावी आणि ती कोणाला सांगावी. म्हणजे स्थानिक लेव्हलचं काम माणून मुंबईला येऊन सांगतो. आणि मुंबईचे नेते त्याला इथे आल्यावर इथलं काम सांगत नाही त्याला मुंबईचं काम सांगतात". असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.