Incoming Call : तुमच्याही कॉलिंग अ‍ॅपचे डिझाईन बदलले आहे का? थांबा आधी हे वाचा! Incoming Call : तुमच्याही कॉलिंग अ‍ॅपचे डिझाईन बदलले आहे का? थांबा आधी हे वाचा!
ताज्या बातम्या

Incoming Call : तुमच्याही कॉलिंग अ‍ॅपचे डिझाईन बदलले आहे का? थांबा आधी हे वाचा!

गुगलच्या नवीन अपडेटमुळे अँड्रॉइड कॉलिंग अॅपचे डिझाईन बदलले, हॅकिंगचा संबंध नाही.

Published by : Riddhi Vanne

तुमच्या स्मार्टफोनमधील कॉल सेटिंग्ज अचानक बदलल्या आहेत का? गेल्या काही दिवसांपासून अनेक अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या फोनमधील कॉलिंग अॅप आणि डायलरचे डिझाइन बदललेले दिसत आहे. या बदलामुळे वापरकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून, काहींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

अँड्रॉइड फोनवर कॉल करताना किंवा आलेला कॉल रिसिव्ह करताना दिसणारा इंटरफेस अचानक बदलल्याने अनेकांना शंका आली की, आपला फोन हॅक झाला की काय. परंतु या बदलामागे हॅकिंग नसून गुगलचं नवीन अपडेट कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे.

गुगलने मे 2025 मध्ये 'मटेरियल 3 डी एक्स्प्रेसिव्ह' नावाचे मोठे अपडेट आणण्याची घोषणा केली होती. या अपडेटचा एक भाग म्हणून अँड्रॉइड फोनच्या कॉलिंग अॅपमध्ये बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला हे अपडेट काही वापरकर्त्यांना देण्यात आले आणि नंतर टप्प्याटप्प्याने सर्वत्र रोलआउट करण्यात आलं.

या अपडेटनंतर फोन अॅपमध्ये 'रिसेन्ट' आणि 'फेव्हरेट्स' हे पर्याय काढून टाकण्यात आले असून, ते 'होम' मध्ये मर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे आता फोन अॅप उघडल्यावर फक्त 'होम' आणि 'कीपॅड' हेच पर्याय दिसतात. याशिवाय कॉल हिस्ट्री वेळेनुसार दाखवली जात आहे, ज्यामुळे एका नंबरवरून आलेले सर्व कॉल्स एकत्र न दाखवता वेगळे वेगळे दिसतात. गुगलच्या म्हणण्यानुसार, यामुळे कॉल हिस्ट्री अधिक स्पष्टपणे समजते. तसेच 'इनकमिंग कॉल' आणि 'इन-कॉल' चे डिझाइनही वापरकर्त्यांच्या फीडबॅकनुसार बदलण्यात आले आहे. फोन खिशातून काढताना चुकून कॉल रिसिव्ह किंवा कट होऊ नये, यासाठी नवीन डिझाइन अधिक सोयीचं असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

गुगलने स्पष्ट केलं आहे की, हे बदल हॅकिंगशी संबंधित नाहीत आणि वापरकर्त्यांच्या डेटावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. हे फक्त कॉलिंग अॅप अधिक सोपं आणि सुरक्षित करण्यासाठी करण्यात आलेले बदल आहेत. जर एखाद्या वापरकर्त्याला नवीन स्टाईल नको असेल, तर त्यांनी फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'अनइन्स्टॉल अपडेट्स' हा पर्याय निवडून जुनी स्टाईल पुन्हा वापरता येते. तसेच, प्ले स्टोअरमधील ऑटो-अपडेट्स ऑफ केल्यास पुढील अपडेट्स आपोआप होणार नाहीत.

म्हणजेच, अँड्रॉइड फोनमधील कॉल सेटिंग्ज अचानक बदलण्यामागे हॅकिंग नव्हे, तर गुगलने केलेला नवीन अपडेट कारणीभूत आहे. वापरकर्त्यांना हवे असल्यास ते नवीन डिझाइन वापरू शकतात किंवा पुन्हा जुनी स्टाईलही निवडू शकतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीची प्राण प्रतिष्ठापना; यंदाच्या गणेशोत्सवासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त

Manoj Jarange EXCLUSIVE : का अन्याय सहन करायचा? काय पाप केलं मराठा तरुणांनी? जरांगे भडकले

Manoj Jarange : जरांगेंचं भगवं वादळ मुंबईकडे; 29 ऑगस्टला आझाद मैदान गाजणार

Story Of Hartalika : हरतालिका म्हणजे काय? जाणून घ्या या व्रताची कथा