ताज्या बातम्या

Cinnamon Benefits : दालचिनीचे आरोग्यासाठी लाभदायक फायदे

दालचिनीचे औषधी गुणधर्म: पचन ते सांधेदुखीवर प्रभावी उपाय

Published by : Team Lokshahi

दालचिनी ही केवळ एक मसाल्याची घटक सामग्री नसून, अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेली वनस्पती आहे. दालचिनीच्या सालीचा वापर पारंपरिक औषधोपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. पचनक्रिया सुधारण्यात ती अत्यंत उपयुक्त असून, गॅस, पोटफुगी, अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी दालचिनीचा वापर प्रभावी ठरतो. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात, गवती चहा, सुंठ, लवंग, मिरी आणि दालचिनीचा काढा घेतल्यास ताप, खोकला आणि सर्दी यावर आराम मिळतो. हा काढा शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून घाम आणतो आणि ताप कमी करण्यास मदत करतो.

दालचिनीचे बारीक चूर्ण पाण्यात मिसळून कपाळावर लावल्यास सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे, दालचिनी आणि मध मिक्स करुन त्याचे चाटण घेतल्याने जुनाट सर्दीचे प्रमाण कमी होतो. दातांच्या आरोग्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरते. दातांतील किड, दुर्गंधी आणि दातदुखी यावर दालचिनी तेलाचा उपयोग केला जातो. तिळाच्या तेलाने गुळण्या करून दालचिनीच्या तेलात भिजवलेला कापूस दुखऱ्या भागावर ठेवला असता वेदना कमी होतात.

सांधेदुखी आणि सांध्यातील आखडतेपणावरही दालचिनीचा उपयोग प्रभावी आहे. दुखऱ्या भागावर दालचिनी तेलाने मालीश करून गरम कपड्याने शेक दिल्यास सूज व वेदना कमी होतात. आवश्यकतेनुसार याचे सीमित प्रमाणात सेवनही करता येते. निसर्गदत्त असलेली ही औषधी वनस्पती आरोग्य रक्षणासाठी सहज उपलब्ध व प्रभावी पर्याय ठरते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा