MonkeyPox and Rajesh tope team lokshahi
ताज्या बातम्या

MonkeyPox आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "भारतात मंकीपॉक्सचा..."

भारतातील परिस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली

Published by : Shweta Chavan-Zagade

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. कोरोनाचा धोका अजून असतानाच आता मंकीपॉक्स या नव्या आजाराने चिंता वाढवली आहे. कांजिण्या किंवा देवी अर्थात स्मॉलपॉक्स किंवा चिकनपॉक्सप्रमाणेच मंकीपॉक्समुळे देखील अंगावर पुरळ उठत असल्याचं लक्षणांमधून दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर त्याचा फैलाव आणि भारतातील परिस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

राजेश टोपे यांनी बुधवारी (25 मे) माध्यमांशी बोलताना भारतातील परिस्थिती आणि महाराष्ट्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती दिली आहे. “मंकीपॉक्स हा दक्षिण आफ्रिकेतून येणारा आजार आहे. ब्रिटन, अमेरिका या देशांमध्ये मंकीपॉक्सच्या काही केसेस आढळल्या आहेत. अद्याप आपल्या देशात एकही मंकीपॉक्सची केस आढळली नाही”, असे राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

असा पसरतो मंकीपॉक्सचा विषाणू

मंकीपॉक्सचा विषाणू कसा पसरतो, याविषयीही राजेश टोपेंनी माहिती दिली आहे. “हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत. साधारण २ ते ४ आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर १ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. एक ते दोन दिवस पुरळ आणि ताप येण्याच्या दरम्यान हा आजार दुसऱ्यांना होण्याची शक्यता आहे”, अशी माहिती यावेळी राजेश टोपेंनी दिली आहे.

काळजी करण्याचं कारण नाही - राजेश टोपे

भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण न आढळल्याने घाबरण्याचं कारण नसल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. “माझं स्पष्ट सांगणं आहे की काळजी करण्याचं कारण नाही. एकही केस भारतात आढळलेली नाही. प्रादुर्भाव असलेल्या देशातून आपल्याकडे येणाऱ्या लोकांचं विमानतळावर स्क्रिनिंग केलं जातंय. काही लक्षणं आढळली तरी त्यांचे स्वब NIP ला पाठवतो. मुंबईत कस्तुरबा गांधी रुग्णालयात एक स्वतंत्र वॉर्ड आणि डॉक्टरांची टीम तयार आहे”, असं ते म्हणाले. “काही लक्षणं आढळत असतील, तर लोकांनी तपासणी करून घ्यावी. हवेतून प्रसार होत नसल्यामुळे लागण होण्याचं प्रमाण फार असू शकत नाही”, असं देखील ते म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली