ताज्या बातम्या

Operation Sindoor : ‘Operation Sindoor’ मिशन नाव ऐकता अश्रु अनावर पुण्यातल्या प्रगती जगदाळे पाहिली प्रतिक्रिया

पुण्यातील प्रगती जगदाळेच्या अश्रूंनी 'Operation Sindoor'ला दिला आवाज; पाकिस्तानवर भारताचा जोरदार हल्ला.

Published by : Team Lokshahi

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी Pakistan दहशतवादांनी भारतीय पर्यटकावर हल्ला केला. त्यांन धर्म विचारुन त्याच्यावर दहशतवादी हल्ला केला होता. याचपार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर बदला घेत 'Operation Sindoor'ची मोहिम केली. या मोहिमेमध्ये भारताने रात्री 1.30 च्या सुमारास पाकिस्तानच्या वेगवेगळ्या ठिकाणावर हल्ला केला.

पहलगाम Pahalgam  येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पतीला गमावलेल्या प्रगती जगदाळे यांनी भारतीय सेनेच्या 'Operation Sindoor'वर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. “या मोहिमेला ‘सिंदूर’ हे नाव दिलं गेलं, हे ऐकून त्याच्या डोळ्यात अश्रू आले,” असं त्यांनी म्हटले आहे. हे नाव ऐकता क्षणीच मन सुद्धा गहिवरून आले असे त्या म्हणाल्या. प्रगती जगदाळे यांचे पती, संतोष जगदाळे, पहलगाम येथील हल्ल्यात मृत्यूमुखी झाले होते. त्या म्हणाल्या, “त्या हल्ल्यानं माझं सिंदूर हिरावलं होतं. आता भारतीय सेनेनं केवळ बदला घेतलेला नाही, तर माझ्यासारख्या अनेक बहिणींच्या वेदनांना न्याय दिला आहे. ‘मिशन सिंदूर’ हे नाव आमच्या भावनांना आवाज देणारं आहे.”

आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी असंही सांगितलं की, “ही मोहीम केवळ लष्करी कारवाई नव्हे, तर ती लाखो आई-वडिलांच्या अश्रूंना समर्पित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमच्या वेदनांची जाणीव आहे, हे पाहून समाधान वाटतं.” भारतीय सेनेच्या कारवाईचं कौतुक करताना त्यांनी म्हटलं, “हा हल्ला केवळ लक्ष्य नष्ट करण्यापुरता मर्यादित नाही. ‘मिशन सिंदूर’ म्हणजे प्रत्येक शहीदाच्या बलिदानाला मिळालेली मान्यता आणि आमच्या अश्रूंना मिळालेला आवाज आहे.” या अभियानांतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील नऊ महत्त्वाच्या दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ले चढवले.

या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून, हवाई दलाच्या या कारवाईत क्षेपणास्त्रांचाही वापर करण्यात आला. हल्ला इतका अचूक आणि वेगवान होता की, पाकिस्तानी हवाई दलाला काही कळायच्या आतच नुकसानाला सामोरे जावं लागलं आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच हादरा बसला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Satara News : आश्चर्यचकित! साताऱ्यातील एका मातेने दिला ७ मुलांना जन्म, नेमकं प्रकरण काय?

Beed Heavy Rain : बीडमध्ये पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला

Income Tax Return Filing : ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस; अंतिम तारीख चुकल्यास...

Latest Marathi News Update live : आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा