स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुनावणी पार पडणार आहे. लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यावर अनेक चर्चा सुरु आहेत.
याच्याआधी मागच्या महिन्यात या प्रकरणी सुनावणी पार पडली होती. न्यायालयाने पुढच्या सुनावणीसाठी 25 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता या प्रकरणी काय सुनावणी होणार आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का? याकडे लक्ष लागले आहे.