ताज्या बातम्या

उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलन; 1000 हून अधिक पर्यटक अडकले

सतत मुसळधार पाऊस पडत असून रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

उत्तर सिक्कीममधील लाचेन-चुंगथांग रोडवरील मुन्शिथांग आणि लाचुंग-चुंगथांग रोडवरील लेमा/बॉबजवळ मोठे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या भागात सतत मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत. त्यामुळे रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.

चुंगथांगकडे जाणारा मुख्य रस्ता आता खुला असला तरी, मुसळधार पावसामुळे रात्रीच्या वेळी त्यावरून प्रवास करणे धोक्याचे आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस आणि रस्ते बंद झाल्यामुळे लाचुंगमध्ये 1000 हून अधिक पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळत आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून सिक्कीम पोलिसांच्या परमिट सेलने उद्यापासून उत्तर सिक्कीमसाठी परमिट देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Weather Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य