Heavy Rain Alert 
ताज्या बातम्या

Heavy Rain Alert: नागरिकांनो सावधान! पुढील ७२ तास धोक्याचे; हवामान खात्याचा 'या' राज्यात हाय अलर्ट

IMD Update: राज्यात पुढील ७२ तास हवामान अत्यंत अस्थिर राहणार आहे. मुसळधार पाऊस, वाढती थंडी आणि प्रदूषणामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

राज्यात सध्या थंडी आणि पावसाचा वेगळाच प्रकार अनुभवला जात आहे. काही ठिकाणी गारठा तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे हवामानातील अनिश्चितता वाढली आहे. राज्यात हवेची गुणवत्ता देखील अत्यंत खराब झाली आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून वायू प्रदूषण वाढले असून, आता पुण्यात देखील हाही क्रम सुरू आहे. पुणे शहरात विशेषतः शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरासह इतर अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर पोहोचली आहे.

भारत हा सध्या जगातील पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. राज्यातील पीएम २.५ आणि पीएम १० कणांचे प्रमाण धोकादायक स्तरावर असल्यामुळे नागरीकांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. याच वेळी, उत्तर भारतात थंडी वाढत असून, त्याचा परिणाम राज्यातही जाणवू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच पुढील महिनाभर थंडी वाढत राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाचा देखील सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात आणि विशेषत: केरळमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 72 तासांसाठी अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. चक्रीवादळामुळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचे दिसून आले आहे. आता हा परिणाम तामिळनाडूवरही होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये राज्यात हुडहुडी कायम राहिल असे सांगण्यात आले आहे.

राज्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, मराठवाडा आणि विदर्भात गारठा अधिक तीव्र होईल. आहिल्यानगर, जेऊर आणि भंडाऱ्यात पारा कमी झाल्याची माहिती आहे. काही शहरांमध्ये तापमान १० अंशांखाली गेला असून थंडीचा तडाखा अधिक वाढू शकतो. राज्यातील नागरिकांनी हवामानातील बदलांचा गडबडीत परिणाम लक्षात घेऊन योग्य खबरदारी घ्यावी, असे तज्ज्ञ सुचवित आहेत.

  • पुढील ७२ तास मुसळधार पाऊस आणि थंडीची लाट कायम राहणार.

  • मुंबई–पुण्यात वायू प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले.

  • केरळ आणि तामिळनाडूत चक्रीवादळामुळे अतिवृष्टीचा धोका.

  • तज्ज्ञांकडून नागरिकांना सावधगिरी व आवश्यक खबरदारीचे आवाहन.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा