ताज्या बातम्या

साताऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी; चारभिंती हरिजन गिरीजन सोसायटी परिसरात कोसळली दरड

साताऱ्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दरडी कोसळण्याचे प्रमाण ही वाढले आहे.

Published by : Dhanshree Shintre

साताऱ्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दरडी कोसळण्याचे प्रमाण ही वाढले आहे. यातच सातारा शहरातील अति पावसामुळे चारभिंती हरिजन गिरीजन सोसायटी रात्री दोन वाजताच्या सुमारास भलीमोठी दरड या सोसायटीच्या रस्त्यावर कोसळली. त्यामुळे या सोसायटीचा रस्ता काही प्रमाणात वाहतुकीसाठी ठप्प झाला आज सकाळपर्यंत दरड तशीच होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मध्यवस्तीत डोंगरावरून भरा मोठी दरड रस्त्यावर कोसळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा शहरातील नगरपालिकेसमोरीलच केसकर पेठ येथे दरड कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या दरडखाली दुचाकी वाहने सायकल अडकले आहेत. दरड इतकी मोठ्या प्रमाणात कोसळली की याचा मोठ्या प्रमाणात आवाज परिसरात झाला त्यामुळे अचानक भली मोठी दरड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोसळलेल्या दरडीच्या दगड मातीच्या ढिगार्‍याखाली वाहने दुचाकी सायकल अडकले आहेत.

ही घटना रात्री दोन च्या सुमारास महाकाय दरड मध्य शहरात वस्तीत कोसळली. त्यावेळी येथील बारटक्के कुटुंबीय भयभीत झाले होते, यासंदर्भात नगरपालिकेला कळवून देखील नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रहिवासी देवेंद्र बारटक्के यांनी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा