Rain  Team Lokshahi
ताज्या बातम्या

सातारा, रत्नागिरीला अवकाळीनं झोडपलं; बागायतदारांना फटका

Rain Updates : अवकाळी पावसानं नागरिकांची धावपळ उडाली.

Published by : Sudhir Kakde

सातारा | प्रशांत जगताप : राज्यात सध्या अनेक भागांत ढगाळ वातावरण (Weather) झाल्याने उन्हाच्या कडाक्यापासून (Heat Wave) काहीसा दिलासा मिळाला. मात्र उकाड्याचा त्रास कायम होता. काही भागांत आज पाऊस (Heavy Rain) झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यातच आज सातारा शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं.

साताऱ्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं प्रचंड उकाडा वाढला होता. त्यामुळे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सातारा शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर-पाचगणी येथील भिलर या भागात जोरदार गारपीट झाली. आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. सोसाट्याचा वाऱ्याने अनेकांची तारांबळ उडाली. वारा सुटल्याने सुमारे एक तासाहून अधिक काळ वीज गायब झाली होती. महाबळेश्वर मार्केटमध्ये अचानक पाऊस आल्यानं पर्यटकांची धावपळ उडाली.

रत्नागिरीत सुद्धा पाऊस...

रत्नागिरी | निसार शेख : चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, लांजा तालुक्यात आज गारांचा पाऊस झाला. चिपळूण मधील खेरशेत नायशी कोकरे भागातही गारांच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला. गारांच्या जोरदार माऱ्यामुळे आंबा आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. पावसाच्या माऱ्यामुळे काही ठिकाणी आंबे गळून पडले. त्यामुळे एकूणच बागायतदारांचं नुकसान झालं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा