ताज्या बातम्या

Heavy Rain In Delhi : दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले; हवामान खात्याचा पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट

आज पहाटे जोरदार वाऱ्यामुळे शेतात बांधलेल्या घरावर झाड कोसळले. या दुर्देवी घटनेत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.

Published by : Team Lokshahi

दिल्लीतील विविध भागात शुक्रवारी पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली. सकाळी पहाटेच्या सुमारास दिल्लीमध्ये आणि जवळच्या परिसरात जोरदार वारे वाहू लागले. त्यामुळे अनेक झाडं पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

दिल्लीतील द्वारका येथील खारखरी परिसरात आज पहाटे जोरदार वाऱ्यामुळे शेतात बांधलेल्या घरावर झाड कोसळले. या दुर्देवी घटनेत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.

शुक्रवारी सकाळी 8 वाजता दिल्लीचे तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदवलं गेले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,आज कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जाऊ शकते. तसेच 2 मे ते 4 मे पर्यंत जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात.

दिल्लीमध्ये झालेल्या पावसामुळे विमानसेवेवर मोठा परिणाम दिसून आला. 40 हून अधिक विमानांची दिशा बदलण्यात आली आहे. दरम्यान 100 हून अधिक विमानांना उशीर होणार आहे. तसेच रस्ते वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनेक भागात वाहतूक कोंडी आहे. भारतीय हवामानं खात्याचे राजधानी दिल्लीसाठी रेर्ड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mira Road Accident : जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षीय बालकाचा मृत्यू

Maharashtra Weather Update: इशारा! पुढील काही दिवस 16 राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; महाराष्ट्रात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पा काय सांगतो ऐका नीट; अजूनही वेळ गेली नाही माझी आरती म्हणताना 'या' चुका नको!

Latest Marathi News Update live : मीरा रोड येथे इमारतीचा स्लॅब कोसळला