ताज्या बातम्या

Rain Alert : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; 11 जिल्ह्यांमध्ये इशारा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सकाळी गारवा, दुपारी उकाडा आणि सायंकाळी ढगाळ वातावरण—अशा बदलत्या परिस्थितीत आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Published by : Varsha Bhasmare

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सकाळी गारवा, दुपारी उकाडा आणि सायंकाळी ढगाळ वातावरण अशा बदलत्या परिस्थितीत आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने मंगळवारी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करत राज्यातील 11 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.

कोणत्या जिल्ह्यांत पाऊस?

24 फेब्रुवारी रोजी सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सातारा, धाराशिव, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत रविवारी रात्रीपासून वातावरणात बदल जाणवू लागला आहे. 23 फेब्रुवारीला काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या, तर आजही ढगांची दाटी वाढलेली दिसत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणारी आर्द्रता तसेच स्थानिक तापमानातील वाढ यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे मेघगर्जनेसह पावसाचे ढग तयार होत असून काही भागांत मुसळधार सरी कोसळू शकतात.

शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अनेक भागांत रबी हंगामातील पिकांची कापणी सुरू आहे. कांदा, गहू आणि इतर पिके शेतात किंवा मोकळ्या जागी साठवलेली असताना पाऊस झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

काय घ्यावी काळजी?

  • कापलेले पीक तात्काळ सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवावे.

  • शेतातील निचरा व्यवस्था सुरळीत ठेवावी.

  • हवामान खात्याच्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे.

  • विजेच्या कडकडाटावेळी उघड्या जागेत थांबणे टाळावे.

पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. हवामानातील हे अचानक बदल दैनंदिन जीवनावरही परिणाम करू शकतात. त्यामुळे पुढील 24 तास महत्त्वाचे ठरणार असून, आपल्या जिल्ह्यात सरी बरसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा