ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update : राज्यात ‘मुसळ’धार! विजांचा कडकडाटासह दमदार पाऊस

Maharashtra Rain Update राज्यातील अनेक भागांत यल्लो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलायं, तर विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • राज्यात पुढील दोन दिवसही जोरदार पाऊस बरसणार

  • विदर्भात हलक्या पावसाची शक्यता

  • हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांत यल्लो अलर्ट

राज्यातील अनेक भागांत नवरात्रीच्या पूर्वसंध्येपासून विजांच्या (Maharashtra Rain Update) कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत असून पुढील दोन दिवसही जोरदार पाऊस राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातील अनेक भागांत यल्लो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलायं, तर विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे.

राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण भागात पाऊस अद्यापही सुरुच असून काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आलीयं. मराठवाड्यात धाराशिवच्या उमरगामध्ये पावसाने उच्चांकी गाटली असून 120 मीमी पावसाची नोंद झालीयं. राज्यात विंजासह वादळी पावसाला पोषक हवामान कायम आहे. आज (ता. २२) मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, उत्तर अंदमान समुद्रात म्यानमारच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने या भागात आज (ता. २२) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. या प्रणालीपासून उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यातच दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत गुरुवारपर्यंत (ता. २५) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली तीव्र होणार आहे.

अखेरच्या टप्प्यात असलेला पाऊस सप्टेंबरअखेरीस राज्यात पुन्हा एकदा जोरदार कोसळण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात 22 सप्टेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र (लो प्रेशर एरिया) निर्माण होऊन 24 सप्टेंबरपर्यंत ते अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. परिणामी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, मुंबईमध्ये 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान मुसळधार कोसळू शकतो.दरम्यान, कोकण किनारपट्टी, मुंबई आणि गुजरातमध्ये 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान 16 ते 20 ऑगस्टदरम्यान झालेल्या पावसासारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राला 25 ते 28 सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shreyas Iyer : ध्रुव जुरेलला कर्णधारपदाची संधी, श्रेयस अय्यरने घेतली विश्रांती

Special Train : मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यासाठी मुंबईहून विशेष रेल्वे धावणार

Diwali School Holidays : शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दिवाळीनिमित्त शाळांना इतक्या दिवस सुट्ट्या

Pakistan Air Strike In Khyber : पाकिस्तानने त्यांच्याच J-17 फायटर जेटद्वारे स्वतःच्याच नागरिकांना ठार मारले! पण अशी वेळ येण्यामागचं कारण काय?