Navi Mumbai Rainfall  Twitter
ताज्या बातम्या

Rain Update: नवी मुंबईची झाली तुंबई! रस्त्यांना तलावाचे स्वरुप, वाहतुकीला बसला मोठा फटका, पाहा VIDEO

आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.

Published by : Naresh Shende

Navi Mumbai Heavy Rainfall Video : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरुच आहे. परंतु, आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. पावसानं थैमाना घातल्यानं नवी मुंबई परिसरात रस्त्यांना तलावाचं स्वरुप आलं आहे. सखल भागात पाणी साचल्यानं वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नवी मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईत पुढचे २४ तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईच्या मरिन ड्राईव्हवरही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईत जोरदार पाऊस सुरु असल्यानं सायन, दादर, हिंदमाता परिसरात पावसाचं पाणी साचलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा