Ajit Pawar Lokshahi
ताज्या बातम्या

मुसळधार पावसानं महाराष्ट्राला झोडपलं! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना, म्हणाले...

रायगड, रत्नागिरीसह पुण्यातही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाचा आढावा घेत पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं.

Published by : Naresh Shende

Ajit Pawar Press Conference: राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात नद्यांना महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही धरणांमध्येही पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पुण्यातील खडकवासला धरण १०० टक्के भरलं असून धरणाचे दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. पुण्यातही पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाचा आढावा घेत पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

आताच दुपारच्या वेळी पाणी वाढवायचा असेल तर वाढवा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सातच्या पुढे अंधार पडल्यावर पाणी वाढवलं तर, सखल भागात पाणी साचून नागरिकांना नाहक त्रास होतो. साधारण ५० टक्के पाणी जेव्हा त्या धरणात येतो, तेव्हढा आऊट फ्लो आपण ठेवला आहे. परंतु, अजून तो वाढवायला सांगितला आहे. जेणेकरून ५० टक्के धरण ठेवावं, रात्री पाऊस जास्त झाला तर तेव्हढा पाणीसाठा वाढवण्याची क्षमता धरणात असली पाहिजे. पाणशेत, पवनामध्ये पाणी साठवण्याची क्षमता आपल्याकडे आहे. सर्व धरणांचे जिथे कॅनोल आहेत, ते सर्व सोडायला सांगितले आहेत. उपसा सिंचन योजनाही चालू करायला सांगितल्या आहेत.

त्या सुरु झाल्या आहेत. जिथे पाऊस कमी अशा आहे, अशा ठिकाणी पाण्याचे साठे करायला सांगितले आहेत. मुळशी धरणही बऱ्यापैकी भरलेलं असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना सांगून वीज निर्मीती करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. बाकीचं पाणी मुळा नदीत सोडलेलं आहे. पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांना आणि त्याठिकाणच्या टीमलाही अलर्ट राहायला सांगितलं आहे. लवासा गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. खडकवासल्याचं पाणी दिवसा सोडण्याचा प्रयत्न केला आहे. सह्याद्रीच्या भागात पाऊस पडतोय.

रायगड, रत्नागिरीला रेड अलर्टच दाखवलेला आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरेपर्यंत प्रशासन थांबलं का? यावर बोलताना अजित पवार म्हणाले, नाही. वरुन एकदम जोरात पाणी आलं. खडकवासला धरण फक्त पावणे तीन टीएमसीचं आहे. काही सोसायट्यांमध्ये टाकीत पाणी शिरलं आहे. त्यांना पाणी प्यायलाही नाही, शासनाकडून काय उपाययोजना करण्यात येणार आहे, यावर बोलताना पवार म्हणाले, त्यांच्यासाठी टँकरच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी