मुंबईत मागील काही दिवस पावसाचं थैमान सुरु असून आज पावसाने रौद्ररूप धरल्याचं पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.दरम्यान रात्रीपासूनच्या मुसळधार पावसामुळे आता दादर स्टेशन परिसरात पाणी भरले असून लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहे. त्याचसोबत 2006 नंतर वरळी नाक्यावर पहिल्यांदा पाणी साचलं आहे.
तसेच, रात्री वादळी वाऱ्यासह अति जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे संध्याकाळी मुंबईत समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समुद्राला सायंकाळी 6:51 वाजता 3.08 मीटर भरती येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तावला असून मध्यरात्रीनंतर 1:56 वाजता 1.22 मीटर ओहोटी देखील येण्याचं म्हटलं जात आहे. मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुंबईला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी