Heavy Rains in Mumbai Team Lokshahi
ताज्या बातम्या

Heavy Rains in Mumbai: मुंबई, ठाण्यासह उपनगरात जोरदार पाऊस

आज पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरू. मुंबईतील रस्ते वाहतूक व मुंबई लोकलच्या वाहतुकीवरपरिणाम....

Published by : Vikrant Shinde

मुंबईमध्ये मागील 2-4 दिवसांपासून पावसाने जरा उसंत घेतलेली पाहायला मिळाली होती मात्र, आज पहाटेच्या सुमारास मुंबईमध्ये पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटींग सुरू केली आहे. मुंबई सह ठाणे व मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरातही पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे.

मुंबईतील काही भागांत वाहतुकीवर परिणाम:

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाले आहेत. वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन परिसरात काही वेळ जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, पाऊस असाच सुरू राहिल्यास मुंबईतील रस्ते वाहतुकीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई लोकलवर काही परिणाम?

खरंतर रविवार म्हणजे मुंबईकरांच्या लाईफलाईनसाठी अर्थात मुंबई लोकल साठी मेंटेनन्सचा दिवस मात्र, आज मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नसल्यानं प्रवासी आनंदले होते. सध्या मुंबई लोकल सुरळीतपणे सुरू आहे. परंतु, पाऊसाचा जोर असाच सुरू राहिल्यास मुंबईतील लोकल वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई व्यतिरिक्त आणखी कुठे बरसण्याची शक्यता?

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसंच पालघर, नाशिकमधील घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. एकंदरीत, महाराष्ट्रातील अनेक भागांत आज पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा