dana cyclone at odisha 
ताज्या बातम्या

Dana Cyclone नंतर ओडिशात जोरदार पाऊस

बंगालच्या उपसागरातील दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील किनारपट्टीवर सर्तकेचा इशारा देण्यात आला होता. ओडिशामध्ये 'दाना' चक्रीवादळ हवामान विभागाच्या अंदाजानुसार धमरा आणि भितरकनिकादरम्यान धडकले.

Published by : Team Lokshahi

बंगालच्या उपसागरातील दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील किनारपट्टीवर सर्तकेचा इशारा देण्यात आला होता. ओडिशामध्ये 'दाना' चक्रीवादळ हवामान विभागाच्या अंदाजानुसार धमरा आणि भितरकनिकादरम्यान धडकले. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारापासून सकाळी साडेआठपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. वादळानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील स्थिती सामान्य असून, रेल्वे आणि विमानसेवा सुरू झाल्या आहेत.

ओडिशा किनारपट्टीवर तासाला 110 किलोमीटर वेगाने ते धडकले आणि नंतर त्याची तीव्रता कमी झाली. या वादळादरम्यान ओडिशामधील भद्रक जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील चांदबाली येथे 158.6 मिमी पावसाची नोंद झाली. राजकनिका येथे 156 मिमी पावसाची नोंद झाली.

वासुदेवपूर, औपाडा, मर्षाघाई या ठिकाणीही शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. शनिवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भद्रक, बालासोर, मयूरभंज जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...