Chhatrapati Sambhaji Nagar 
ताज्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा; शेतपिके व फळबागांचे प्रचंड नुकसान

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीला मोठा फटका बसला. खरीप पिके तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेती व फळबागांचे मोठे नुकसान

  • शेतकऱ्यांनी रस्त्यावर मोसंबी फेकून व्यक्त केला संताप

  • सरकारकडे वाढीव नुकसानभरपाई, कर्जमाफी व पिक विम्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीला मोठा फटका बसला. खरीप पिके तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी मोसंबी अक्षरशः रस्त्यावर फेकावी लागत असून उत्पादनाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल पाहायला मिळत आहे.

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसोबतच फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आणि वाढीव नुकसानभरपाईची मागणी केली आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, खरीप पिकांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये, तर फळबागांसाठी एक लाख रुपये अनुदान मिळावे. यासोबतच कर्जमाफी व पिक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kanya Pujan 2025 : नवरात्रीत कन्या पूजन कधी करावे? सर्वकाही जाणून घ्या...

Holiday for schools in Palghar District : पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय

'या' ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शकांच्या पहिल्या पत्नीचे निधन; 'MISS YOU Mumma.. म्हणत मुलाने पोस्ट टाकत केल्या भावना व्यक्त

India vs Pak Final 2025 : शिवसेनेच्या विरोधानंतर PVR चा मोठा निर्णय