थोडक्यात
माउंट एव्हरेस्टवर हिमवृष्टी
हिमवृष्टीमुळे सुमारे 1000 गिर्यारोहक आणि पर्यटक अडकले
350 गिर्यारोहकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले
(Mount Everest) तिबेटमधील माउंट एव्हरेस्टच्या पूर्वेकडील भागात झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे सुमारे 1000 गिर्यारोहक आणि पर्यटक अडकले आहेत. सलग दोन दिवस सुरु असलेल्या हिमवादळामुळे रस्ते पूर्णपणे बंद झाले असून बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. आतापर्यंत सुमारे 350 गिर्यारोहकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी सायंकाळपासून तिबेटच्या दिशेने हिमवृष्टीला सुरुवात झाली आणि शनिवारी सकाळपर्यंत ती अधिक तीव्र झाली. या भागात तापमान शून्याखाली घसरले असून, 4,900 मीटरपेक्षा जास्त उंचीवरील शिखरावर बर्फाची पातळी वेगाने वाढली आहे. त्यामुळे पर्वत मार्ग आणि ट्रेकिंगचे रस्ते संपूर्णपणे बर्फाखाली गेले आहेत. गिर्यारोहकांसाठी मार्ग बंद झाल्याने ते अडकून पडले. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव दलांनी मिळून मोठ्या प्रमाणावर शोध आणि मदतकार्य सुरु केले आहे.
माउंट एव्हरेस्टच्या परिसरात दरवर्षी हजारो गिर्यारोहक ट्रेकिंगसाठी जातात. ऑक्टोबर महिन्यातील हवामान सर्वात स्थिर आणि सुरक्षित मानले जात असल्याने या काळात पर्यटकांची विशेष गर्दी असते. परंतु, यंदा अचानक हिमवृष्टी झाली स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, “बर्फवृष्टीने सर्व मार्ग बंद झाले असून, सुरक्षित स्थळी नेण्यात आले. यातच पुढील 24 तासांत हिमवृष्टी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तोपर्यंत ट्रेकिंग थांबवण्यात आले आहे.