सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरु आहे. या उन्हाळ्यामध्ये अनेकदा थंड पेय पिण्याची खूप मोठ्या प्रमाणात इच्छा होते. यामधील एक आवडीने प्यायले जाणारे पेय म्हणजे कोल्डकॉफी. अनेकांना कोल्ड कॉफी पिणे खूप पसंत आहे. कॉफीमुळे आपल्या शरीरात एक ऊर्जा निर्माण होते. पण कोल्ड कॉफी पिण्याचे काही फायदे आणि नुकसानदेखील आहेत. त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया.
कोल्ड कॉफीचे फायदे :
उन्हाळ्यात कोल्ड कॉफी प्यायल्याने शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा मिळते. पण फायद्यांसोबतच त्याचे तोटेही आहेत. कोल्ड कॉफीमध्ये कॅफिन आढळते.ज्यामुळे तुम्ही सजग ताजेतवाने राहू शकता. तसेच थकवा कमी होतो याशिवाय साखर आणि मलईचा वापर करताना जास्त प्रमाणात वापर केला नाही तर शरीराला थंडावा तर मिळतोच शिवाय वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
कोल्ड कॉफी पिण्याचे तोटे :
कोल्ड कॉफीचे जास्त सेवन केल्यास डिहायड्रेशन, नर्व्हसनेस, ॲसिडिटी किंवा जर त्यात जास्त साखर किंवा आईस्क्रीम घातली असेल तर झोपेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात शरीराला अधिक पाणी आणि द्रवपदार्थांची आवश्यकता असते म्हणून कॅफिनयुक्त पेये प्यायल्याने तहान कमी होते आणि शरीरातील निर्जलीकरण होऊ शकते.
कॉफी किती प्यावी ?
निरोगी व्यक्ती दिवसातून एकदा सुमारे 150 ते 200 मिलीग्राम कोल्ड कॉफी पिऊ शकते, परंतु त्यात साखर, मलई आणि फ्लेवर्सचे प्रमाण मर्यादित असावे. उच्च रक्तदाब, हृदयाची समस्या किंवा झोपेच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी कोल्ड कॉफी टाळावी किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच सेवन करावे.कोल्ड कॉफी हा उन्हाळ्यात एक उत्तम ताजेतवाने पर्याय आहे, परंतु ते मर्यादित प्रमाणात आणि योग्य प्रकारे पिणे महत्वाचे आहे जेणेकरून त्याचे फायदे मिळू शकतील आणि त्याचे नुकसान टाळता येईल.