Helicopter Crash team lokshahi
ताज्या बातम्या

Helicopter Crash : रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टर कोसळलं, दोन पायलटचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये रायपूर विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान क्रॅश झाले आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायपूर विमानतळावर (Raipur Airport) एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मोठ्या अपघातानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. रायपूर पोलिसांनी अपघाताला दुजोरा दिला आहे. रायपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन एपी श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री ९.१० च्या सुमारास रायपूर विमानतळावर घडली.

दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनानंही दोघांच्या मृत्यूची पुष्टी केलीय. दोघांनाही आता आयसीयूमधून बाहेर काढलं जात असून मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवलं जाणार आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचं पूर्णपणे नुकसान झालं असून, त्याच्या पंखाचा काही भाग निखळला आहे. मात्र, अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीय. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनीही ट्विट करून या घटनेची माहिती दिलीय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात