सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी (TRAI) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून एक नवीन नियम लागू केलायं. आता देशातील मोठ्या बॅंका, म्युचुअल फंड कंपनी, शेअर मार्केटशी संबंधित संस्था आणि पेन्शनरांना फोनकॉल्ससाठी ‘1600’ पासून सुरु होणाऱ्या नंबरचाच वापर करणार आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगार, बॅंकेतून बोलत असल्याचं सांगून फसवणूक करणाऱ्यांवर आळा बसणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना फसवणूक करणाऱ्यांपासून संरक्षण मिळणार आहे.
या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार असून त्यांना फोन खरंच बॅंकेतून आलायं की नाही? हे तपासता येणार आहे. सध्या, 10 अंकी मोबाईल नंबरवरुन फोन करुन ओटीपी, युपीआय पीनसारखी माहिती घेत फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने या गुन्ह्यांची दखल घेत 1600 नंबरच्या सीरीजची सुरुवात केली आहे. 1600 नंबरपासून सुरु होत असलेल्या नंबरवरुनच आता संस्थांमधून सर्वसामान्यांना फोन येणार आहेत.
15 फेब्रुवारी 2026 पर्यंतच म्युच्यूअल फंड आणि इतर कंपन्यांना 1600 नंबर घेणे बंधनकारक असणार आहे. कारण 1600 नंबरची सेवा 15 मार्च 2026 पासून सुरु करण्यात येणार आहे. मोठ्या बॅंका किंवा इतर संस्थांना यासोबतच 1 जानेवारी 2026 पासून 1600 नंबरच्या सिरीजचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर एनबीएफसी आणि इतर पेमेंट फेब्रुवारीपर्यंत बॅंका सहभागी होणार आहे. पेन्शनशी संबंधित संस्थांनाही 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत 1600 सिरीजच्या नंबर वापरणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, वित्तीय संस्थांकडून आता यापुढे 1600 नंबरची सिरीज असलेल्या नंबरवरुन फोन आल्यास तोच फोन कॉल आला आहे, असं मानलं जाणार आहे. भारतीय दूरसंचार प्राधिकणाकडून सायबर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतलायं. त्यामुळे आता फसवणूकीला आळा घालण्यास मदत होणार आहे.