भाजपच्या एका कार्यक्रमात खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता विधान परिषदेचे गटनेते आमदार हेमंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अशोकराव चव्हाण साहेब म्हणजे भाजप नाही. नव्याने माननीय अशोकराव आले. त्याच्यामुळे युती धर्माची माहिती त्यांना कमी आहे. कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हातगाव येथे आले असताना आम्ही चारही आमदार त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितले की, त्यांना समजावून सांगा की, अशा पद्धतीने वक्तव्य बरोबर नाही. यातून नेमकं पक्षाला, युतीला, कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायचाय?
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आज जी काही आमदार मंडळी झालेली आहेत ती एकदम सामान्य घरातून आलेली मंडळी आहेत. त्यांच्याविरोधात लढणाऱ्या माणसांना बळ देताय म्हणजे शत्रूंना तुम्ही मोठं करताय. हे चुकीचं आहे. या सर्व गोष्टी माननीय फडणवीस साहेबांच्या कानावर घातलेल्या आहेत. योग्य ते समज त्यांना देणार आहेत. असे हेमंत पाटील म्हणाले.