ताज्या बातम्या

Kunal Kamra : कुणाल कामराला उच्च न्यायालयाचा दिलासा; अटक न करण्याचे आदेश, पण...

अटकेची टांगती तलवार होती.

Published by : Shamal Sawant

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपहासात्मक गाणं गायल. या गाण्यामधून तो एकनाथ शिंदे यांना गद्दार असे म्हणाला. यामुळे त्याच्या अनेक गुन्हेदेखील दाखल करण्यात आले. यामुळे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार होती. अशातच आता कुणालला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

आपल्यावरील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी कामरा याने केलेली याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेताना कामराविरोधातील तपास सुरू ठेवावा, परंतु, याचिका प्रलंबित असेपर्यंत कामरा याच्यावर अटकेची कारवाई केली जाऊ नये. तसेच, चेन्नई येथे जाऊन त्याचा जबाब नोंदवण्यात यावा, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले.

मुंबई उच्च न्यायालयाने 16 एप्रिल रोजी कामराला निकाल येईपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने कामराला अटकेपासून अंतरिम संरक्षण 17 एप्रिलपर्यंत वाढवले होते. न्यायालयाने मुंबई पोलिसांना चेन्नईला जाऊन त्याची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या विडंबनात्मक टिप्पणीबद्दल दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठीची याचिका हायकोर्टानं सुनावणीसाठी दाखल करून घेतलीय. ही याचिका प्रलंबित असेपर्यंत कुणाल कामराला अटक न करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. तर कुणाल कामराची चौकशी करण्यासाठी हायकोर्टाने मुंबई पोलिसांना परवानगी दिलीये. मुंबई पोलीस चेन्नईला जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कामराचा जबाब नोंदवणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा