थोडक्यात
अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रेंना नोटीस
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बजावली नोटीस
निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा आरोप
अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. या नोटीसला 2 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
खासदार अनुप धोत्रे यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केला असल्याचा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी अनुप धोत्रे यांच्या लोकसभेवरील निवडीला आव्हान दिले आहे. त्यामुळे आता कोर्टाच्या या नोटीसीमुळे थेट त्यांच्या खासदारकीलाच मोठे आव्हान देण्यात आले आहे.