यंदा गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठल्याने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तरीही उंच मूर्ती विसर्जनाचा मोठा पेच अजूनही गणेश मंडळे आणि सरकारसमोर आहे. मात्र तरीही अनेक सार्वजनिक मंडळांनी मूर्ती 15 ते 20 फूट उंच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या विरोधात असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तरीही खंडपीठाने मोठ्या व उंच मूर्तींच्या विसर्जनाचा निर्णय राज्य सरकारच्या हाती सोपवला आहे. राज्य सरकारने मोठ्या मूर्तींच्या मुद्द्यावर 30 जूनपर्यंत तोडगा काढावा, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.
साधारण गणेशाची मूर्ती बनवण्याची तयारी ही एप्रिल-मेपासून सुरू होते. अनेक मंडळाचे त्यांच्या गणेश देखाव्याप्रमाणे मूर्तींची उंची ठरलेली असते. साधारण मोठमोठ्या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीची उंची साधारण 15 ते 20 फूट इतकी असतेच. त्यासाठी साधारण 5 ते 6 महिन्यांपासून तयारी केली जाते. मात्र उंची मूर्ती विसर्जनाचा निर्णय घेण्यासाठी 30 जूनपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली असली तरी त्यानंतर मूर्तीच्या उंचीचा निर्णय घेऊन मग मूर्ती घडवणे शक्य नसल्याने आधीच्या वर्षाप्रमाणेच मंडळांनी आधीच मूर्ती बनवण्याचे नियोजन सुरू केले आहे. मोठ्या मुर्त्यांसाठी एकतर नैसर्गिक प्रवाहांचा वापर केला जाऊ शकतो किंवा नंतर जो निर्णय घेतला जाईल.
त्याप्रमाणे विसर्जन करता येईल असा पवित्रा गणेश मंडळांनी घेतला आहे. मात्र पीओपी मूर्तींची निर्मिती आणि विक्री करता येईल, मात्र त्यांचे विसर्जन नैसर्गिक जल प्रवाहांमध्ये करता येणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आले. त्यामुळे मोठ्या आणि उंच मूर्तींचा प्रश्न कायम असल्याचे सध्या चित्र आहे. दरम्यान, राज्य सरकारला संस्कृती टिकवायची असेल तर त्यांनीही योग्य तो निर्णय घ्यावा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. राजकीयदृष्ट्या महापालिका निवडणुकीसाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याने कोणतातरी योग्य निर्णय घेतला जाईल, अशी आशा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. मुंबईमध्ये अनेक तलावांचा वापर सध्या बंद आहे. अशा तलावांची साफसफाई केली जावी, तसेच हे तलाव विसर्जनासाठी दिले जावे, असाही एक सूर या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हेही वाचा