ताज्या बातम्या

महागाईची झळ: मुंबईत सुटे दूध 7 रुपयांनी महागणार, 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार

महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सामान्य जनतेच्या खिशाला जबरदस्त कात्री बसली आहे. एकीकडे बाजारात गणेशोत्सवाची लगबग आहे. आणि सणासुदीच्या दिवसांत महागाईची झळही ग्राहकांना सोसावी लागतेय.

Published by : Siddhi Naringrekar

महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सामान्य जनतेच्या खिशाला जबरदस्त कात्री बसली आहे. एकीकडे बाजारात गणेशोत्सवाची लगबग आहे. आणि सणासुदीच्या दिवसांत महागाईची झळही ग्राहकांना सोसावी लागतेय. मुंबईत आता सुटे दूध सात रुपयांनी महागणार आहे. अलिकडेच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता मुंबईत सूट्या दुधाचे दर वाढणार आहेत. मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ग्राहकांना आता 80 रुपये मोजावे लागणार आहेत.

ही सुट्या दूधाची दरवाढ 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. अलिकडेच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. दिवाळीपर्यंत पोहे, चिवडा हा फराळही महागणार आहे.

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात किलोमागे सरासरी पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा