महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीविरोधातील मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. शाळेमध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकवण्यात यावी याबद्दलचा जीआर काढण्यात आला. याला विरोध म्हणून उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्रित येत हिंदी भाषा सक्ती विरोधात मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आज हिंदी भाषा सक्ती विरोधातील जीआर रद्द करण्यात आला. या अनुषंगाने आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांकया एकत्रित मोर्चा रद्द केला आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेचे आणि पत्रकारांचे आभार मानले आहेत.
नंतर राज ठाकरे म्हणाले की, "हिंदी सक्तीचे दोन्ही GR फडणवीस सरकारने रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. मराठी भाषेबाबत तडजोड होता कामा नये, सरकारने पुन्हा अशी चूक करायला नको, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले. तसेच राज ठाकरे यांनी 5 तारखेला विजयी मेळावा होणार असल्याचेदेखील सांगितले आहे. मात्र मेळाव्याचे ठिकाण अद्याप ठरले नाही.