Hindu Rashtra Association President Tushar Hambir Team Lokshahi
ताज्या बातम्या

Pune Breaking: हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीरवर रुग्णालयात जीवघेणा हल्ला

हंबीर याला उपचारासाठी दहा दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात केलं होतं दाखल.

Published by : Vikrant Shinde

चंद्रशेखर भांगे | पुणे: हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीरवर ससून रुग्णालयामध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. हा हल्ला करणाऱ्या व्यक्ती अज्ञात होत्या. दरम्यान, हंबीर याला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी या हल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

कोण आहे तुषार हंबीर?

खुन आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये तुषार हंबीर हा मागील अनेक वर्षे येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. दहा दिवसांपुर्वी तब्बेत बिघडल्याने हंबीर याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं होतं.

नेमकं काय घडलं?

उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमधून हंबीर याला बाहेर काढल्यानंतर तुषार हंबीरला पहाण्याचा आल्याचा बहाणा करून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी हंबीर याच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फायरिंग चुकली असता हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत हंबीर याच्यावर खुनी हल्ला केला. फायरिंग करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर कोयत्याने खुनी हल्ला करत असताना पोलिस कर्मचारी अमोल बगाड यांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात बगाड हे गंभीर जखमी झाले आहेत. यापुर्वीही तुषार हंबीर याच्यावर येरवडा कारागृहात हल्ला झाला होता.

दरम्यान, ससून सारख्या सर्वोच्च रुग्णालयात जीवघेणा हल्ला झाल्याने शहरासह राज्यभरात प्रचंड खळबळ माजली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा