ताज्या बातम्या

QR Code ची रंजक गोष्ट; काळ्या-पांढऱ्या दगडांच्या खेळामुळे झाला क्यूआर कोडचा जन्म

काळा-पांढरा दिसणारा हा चौकोनी क्यूआर कोड पाहताना साधा वाटतो, पण त्यामागे लपलेली आहे एक भन्नाट गोष्ट, जी जगाने अनुभवलेली डिजिटल क्रांती घडवते.

Published by : Team Lokshahi

तुमच्या मोबाईलच्या एका क्लिकवर आज पेमेंट होते, माहिती मिळते आणि सेवांपर्यंत पोहोचता येते. हे शक्य झाले आहे, एका अद्भुत कोडमुळे. काळा-पांढरा दिसणारा हा चौकोनी क्यूआर कोड पाहताना साधा वाटतो, पण त्यामागे लपलेली आहे एक भन्नाट गोष्ट, जी जगाने अनुभवलेली डिजिटल क्रांती घडवते.

एक कल्पना, जी बनली भविष्य

1994 साल ठिकाण जपान. टोयोटाच्या उपकंपनी डेन्सो वेव्हमध्ये कार्यरत असलेले अभियंता मासाहिरो हारा ऑफिसमध्ये 'गो' नावाचा बुद्धिबळासारखा खेळ खेळत होते. काळ्या-पांढऱ्या दगडांचा खेळ पाहताना त्यांना एक कल्पना सुचली. एक असा कोड बनवायचा जो झपाट्याने माहिती देईल आणि तिथेच झाला क्यूआर कोडचा जन्म.

बारकोडचा इतिहास आणि QR कोडचा पुढचा टप्पा

बारकोडने सुरुवात केली खरी पण त्याला मर्यादा होत्या. 1974 मध्ये अमेरिकेतील ओहायो राज्यात एका किराणा दुकानात पहिल्यांदा बारकोड वापरण्यात आला. पण हारा यांना काहीतरी वेगळं, अधिक माहिती, अधिक वेग आणि अधिक अचूकता हवी होती. त्यांनी एक चौरस कोड तयार केला. जो कोणत्याही कोनातून स्कॅन होतो, ज्यात हजारो अक्षरं साठवता येतात आणि जो डेटा थोडा खराब झाला तरीही वाचता येतो. त्यासाठी त्यांनी तीन कोपऱ्यांमध्ये खास ब्लॉक्स दिले जे कोडची 'ओळख' स्कॅनरला पटकन करून देतात.

QR कोड: जो समोर आला, तो स्कॅन झाला

2012 नंतर काही काळ QR कोड मागे पडल्यासारखा वाटला. पण मग स्मार्टफोन क्रांती आणि WeChat सारखे अ‍ॅप्स आले. चीनने QR कोडला पुन्हा केंद्रस्थानी आणले. पेमेंट्स, कूपन, लॉगिन्स, इव्हेंट्स, QR कोड सर्वत्र पसरले. कोरोना काळात, जेव्हा स्पर्श कमी करणे गरजेचे झाले, तेव्हा QR कोड ‘सुरक्षित व्यवहारांचा राजा’ बनला. भारतात किराणा दुकानांपासून नारळ पाण्याच्या गाड्यांपर्यंत, सगळीकडे "पे करा, स्कॅन करा"चा ट्रेंड सुरू झाला. छोट्या विक्रेत्यांनाही डिजिटल व्यवहाराची सहजता मिळाली.

आज QR कोड केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर तो आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी शाळेतील उपस्थितीपासून, रेल्वे तिकिटांपर्यंत आणि रेस्टॉरंटच्या मेनूपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याची छाप आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा