Sambhajinagar (Aurangabad) Team Lokshahi
ताज्या बातम्या

Raj Thackeray यांनी उल्लेख केल्याप्रमाणे औरंगाबादचे मुळ नाव खडकी; काय आहे इतिहास?

औरंगाबाद ह्या शहराचा सर्वांत जुना उल्लेख हा सातवाहन काळामध्ये आढळतो

Published by : Vikrant Shinde

महाराष्ट्राचा इतिहास पाहता औरंगाबाद (Aurangabad) हे शहर अनेक प्रकारे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय चळवळींचं केंद्र ठरलेलं आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून औरंगाबाद हे शहर पुन्हा चर्चेत आल्याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील जाहीर सभेची घोषणा. राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या ह्या सभेमध्ये राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) पुन्हा एकदा हिंदुत्व आणि मशिदींवरील भोंग्यांचा विषय घेतला. याच भाषणादरम्यान, त्यांनी औरंगाबाद शहराच्या नावाविषयीही वक्तव्य केलं.

राज ठाकरे काय म्हणाले?

औरंगाबाद येथील जाहीर सभेमध्ये भाषण करताना त्यांनी औरंगाबाद शहराच्या नावाचा उल्लेख केला. त्यावेळी ते म्हणाले, "संभाजीनगर, संभाजीनगर या शहराचं मुळ नाव हे खरंतर 'खडकी' असं होतं".

औरंगाबाद शहराच्या नावाचा इतिहास:

औरंगाबाद ह्या शहराचा सर्वांत जुना उल्लेख हा सातवाहन काळामध्ये आढळतो तसेच, विक्रमादित्य राजाच्या काळातही या जागेचा उल्लेख आढळतो. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी गावं होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे औरंगाबाद आहे असे मानले जाते. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गावाचा राजतलक किंवा राजतडाग म्हणूनही उल्लेख आढळतो. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या यादवांचे राज्य होते.

काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा (द्वितीय) याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. वास्तविकत: हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहपूर ठेवले होते. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी/फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्ऱ्याला परत गेला. त्यानंतर १६८१ मध्ये औरंगजेब मुघल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला. ह्या दरम्यानच त्याने या शहराचं नाव बदलून स्वत:च्या नावावरून 'औरंगाबाद' असे ठेवले. १७०७ मध्ये मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद या छोट्याशा गावात औरंगजेबाची कबर आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष