Maharashtra Weather Update : लातूर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर ... Maharashtra Weather Update : लातूर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर ...
ताज्या बातम्या

Maharashtra Weather Update : लातूर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर ...

लातूर पाऊस: मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी, येलो अलर्ट जारी.

Published by : Riddhi Vanne

Holiday Declared for Schools in Latur District Today Due to Heavy Rains in Latur District... : काही दिवसांपासून पाऊस थैमान घालत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. पुढील तीन ते चार दिवसात पावसाच जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच कोकण, विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 60 पैकी 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. या पावसामुळे नदी, ओढ्यांची पाणी पातळी वाढून रस्ते, पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 49 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. उद्या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे ,अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

Afternoon News LIVE | Top Headlines | Maharashtra Politics | Breaking | Lokshahi Marathi

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा