होम लोन घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील तीन प्रमुख सरकारी बँकांनी त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडिया यांनी जुलै महिन्यात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये पाच बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे.
पंजाब नॅशनल बँकेने ओव्हरनाईट एमसीएलआर 8.25 टक्क्यांवरून 8.20 टक्क्यांवर आणला आहे. 1 महिन्याचा एमसीएलआर 8.35 टक्के, 3 महिन्यांचा एमसीएलआर 8.55 टक्के आणि 3 वर्षांचा एमसीएलआर 9.20 टक्के झाला आहे.
इंडियन बँकेने ओव्हरनाईट एमसीएलआर 8.20 टक्के निश्चित केला आहे. 1 महिन्याचा एमसीएलआर 8.40 टक्के, 3 महिन्यांचा एमसीएलआर 8.60 टक्के आणि 1 वर्षाचा एमसीएलआर 9 टक्के झाला आहे.
बँक ऑफ इंडियाने ओव्हरनाईट एमसीएलआर 8.10 टक्क्यांवर आणला आहे. 1 महिन्याचा एमसीएलआर 8.40 टक्के, 3 महिन्यांचा एमसीएलआर 8.55 टक्के आणि 1 वर्षाचा एमसीएलआर 9 टक्के निश्चित केला आहे.
अलीकडेच रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात कपात केली होती. त्यानंतर बँकांनी कर्जाचे दर कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवीन गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि सध्याचे गृहकर्ज भरणाऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.