Horoscope
Horoscope  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Horoscope : तूळ राशिच्या लोकांना खर्च करावा लागणार; तुमच्या राशीत काय?

Published by : Sudhir Kakde

मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असणार आहे. तुमच्या मनात चांगले विचार येतील, त्यामुळे तुम्ही तुमचा अधिकाधिक वेळ इतरांची सेवा करण्यात घालवाल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी करण्याचा देखील आज विचार करू शकता. प्रेम संबंधांमध्ये असलेले लोक आज जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जातील.

वृषभ - आज व्यवसाय करणाऱ्या लोकांनी वाणी गोड ठेवून आपलं हीत साधून घेणं महत्वाचं आहे. एखाद्या सरकारी योजनेचा लाभही तुम्हाला आज मिळेल. तुमची रखडलेली कामं तुम्हाला अडचणीत आणतील. त्यामुळे ती कामं वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडल्यास तुमच्या अनेक समस्या दूर होतील.

मिथुन - आज तुम्ही प्रचंड उत्साहाने भरलेले असाल. कोणत्याही क्षेत्रात विचार न करता गुंतवणूक केल्यास, ते तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना पक्षांतर करायचं असल्यास त्यांना काही काळ वाट पाहावी लागेल. तुमच्या मोठ्या इच्छा आज पूर्ण होतील.

कर्क - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज दिवसाची सुरुवात चांगली होईल, पण दुपारनंतर तुम्हाला फार नफा मिळणार नाही. दारूचं व्यसन असणारी मंडळी आज दारु सोडण्याचा विचार करतील. तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवण्याचा आज तुम्ही प्रयत्न कराल. सासरच्या लोकांशी आज तुमचा वाद होऊ शकतो.

सिंह - प्रेम संबंधांमध्ये असलेल्या लोकांच्या आयुष्यात आज काही चढ उतार येऊ शकतात. तुम्ही समजूतदारपणा दाखवून या परिस्थितीतून बाहेर पडू शकाल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना आज बढती मिळू शकते. त्यामुळे त्यांना घरापासून दूर जावं लागू शकतं. मुलांच्या संगतीची विशेष काळजी आज तुम्हाला घ्यावी लागणार आहे.

कन्या - आज तुमचं भाग्य अत्यंत उजळलेलं आहे. नशिबानं तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या डोक्यात काही नवीन कल्पना येतील, त्यातून तूम्ही नफा कमवू शकाल. तुमच्या नातेवाईकांच्या घरी मेजवानीसाठी जाण्याची संधी आज तुम्हाला मिळेल. व्यवसायाशी संबंधित सहलीला गेलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

तूळ - आज दिवसभरात फार खर्च तुम्हाला करावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या खर्चाबाबत चिंतेत राहाल. व्यवसायात अपेक्षित लाभ न मिळाल्याने तुम्ही नवे प्रयोग करण्याचा विचार कराल. कौटुंबिक वाद आज संपुष्टात येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ एकांतात घालवण्याचा विचार तुम्ही कराल.

वृश्चिक - कुटुंबात एखाद्या शूभ कार्याचं आयोजन आज होईल अशी शक्यता आहे. धनसंचय करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. गोड बोलून तुम्ही लोकांची मनं जिंकू शकता. तुमचे अधिकारीही कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा करताना दिसतील. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही मुलाच्या भविष्याशी संबंधित काही योजनांवर चर्चा करू शकता.

धनु - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कठीण जाईल, परंतु भावांच्या मदतीने तुम्ही अडचणीतून मुक्त होऊ शकता. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही, त्यामुळे अजिबात करू नका. तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील, परंतु तुमच्या काही कडू बोलण्यामुळे तुमच्या मित्रांसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. इतरांना सल्ले देण्यापासून दूर राहावे लागेल. आईला अचानक काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

मकर - आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असू शकतो. तुम्हाला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर त्यातही संयम बाळगणं तुमच्यासाठी योग्य राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही कठीण कामही पूर्ण मेहनतीने कराल.

कुंभ - आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाने भरलेला असणार आहे. काही चांगल्या लोकांशी तुम्ही आज संपर्क. आगामी काळातील त्यांच्या काही योजनांसाठी तुम्ही त्यांच्याशी चर्चा कराल. इतरांच्या सल्ल्यानं निर्णय घेणं आज तुम्हाला फायद्याचं ठरणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या कमकुवत विषयांवर मेहनत करूनच यश मिळवावं लागेल.

मीन - नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला राहील. त्यांच्या मनाप्रमाणे कामं झाल्यामुळे तुम्ही अधिक आनंदी राहाल. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून गोड बोलून तुमची काम पूर्ण करून घ्याल. ज्यांना नोकरीसोबत ऑनलाइन कामं करायची आहेत, त्यांच्यासाठी आज चांगला दिवस आहे. घरातील सदस्यांमध्ये वादविवाद झाला तर दोन्ही बाजू ऐकून घेऊनच मध्ये बोला, अन्यथा वाद तुमच्या अंगलट येऊ शकतो.

Rajendra Gavit : शिंदे गटाला धक्का! राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव

Madha Lok sabha Election 2024 : माढ्यात आचारसंहितेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईल कॅमेऱ्याचा वापर

Baramati : सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल, निवडणूक आयोग कारवाई करणार का?

आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट