कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ६ सुरू झाल्यापासून घरात रोज नवनवीन वाद रंगताना दिसत आहेत. विकेंडला रितेश देशमुख घरातील सदस्यांना आरसा दाखवत असतानाच आता एका मोठ्या भांडणाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
आतापर्यंत संयमी आणि शांत दिसणारा अभिनेता राकेश बापट अचानक चिडलेला पाहायला मिळणार आहे. कारण ठरली आहे स्पर्धक अनुश्री माने. एका साध्या बेडच्या विषयावरून सुरू झालेला वाद इतका वाढला की राकेशने थेट घर सोडण्याची भाषा केली.
अनुश्रीच्या काही आक्रमक वक्तव्यांमुळे राकेशचा संतुलन सुटले. त्याने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत तिच्या बोलण्याला आक्षेप घेतला. वाद मिटवण्यासाठी इतर सदस्य पुढे आले, पण राकेशचा राग काही केल्या शांत झाला नाही.
कलर्स मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये घरातील तणाव स्पष्ट दिसतो. हा वाद नेमका कुठपर्यंत जाणार आणि राकेशचा निर्णय काय असेल, हे पाहणं आता प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.