ताज्या बातम्या

Housefull 5: 'हाउसफुल 5' ची Advance Booking मधून मोठी कमाई, दोन Climax ची चर्चा

हाउसफुल 5: आगाऊ बुकिंगमधून 3.88 कोटींची कमाई, दोन शेवटांची चर्चा.

Published by : Team Lokshahi

चित्रपट विश्वातील बहुचर्चित ,अक्षय कुमार Akshay Kumar, नाना पाटेकर Nana patekar, अभिषेक बच्चन Abhishek bacchan स्टार कलाकार हाऊसफुल House Full या लोकप्रिय फ्रॅन्चायझी चा हाऊसफुल 5 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद नाडियाडवाला यांनी निर्मित केलेला आणि तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केलेला "हाउसफुल 5" हा चित्रपट येत्या 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच आगाऊ तिकीट विक्रीतून सुमारे 3.88 कोटी रुपये कमवले आहेत. या चित्रपटाची 45,000 तिकिटे विकली गेली आहेत. प्रदर्शना आधीच या चित्रपटाने आपलं वर्चस्व दाखवत मोठी कमाई केली आहे.

दोन शेवट असलेला चित्रपट

हाऊसफुल या लोकप्रिय फ्रॅन्चायझीचे मागील चार भाग प्रचंड गाजले. आता पाचवा भाग ही लोकप्रिय होणार असे चित्र दिसत आहे. अलीकडेच सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला होता. ज्यावर लोकांनी खूप पसंती दर्शवली आहे. बहुचर्चित आणि 72 कलाकरांनी सजलेला 'हाउसफुल 5' हा चित्रपट येत्या 6 जूनला 5 हजार स्क्रिनवर रिलीज केला जाणार आहे. हा चित्रपट आणखी एका नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी चर्चेत आहे. हाउसफुल 5 ए आणि हाउसफुल 5बी, अशी दोन वेगवेगळी शेवट असलेली संस्करणं एकाच चित्रपटाची आहेत, जी वेगवेगळ्या चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे दोन शेवट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याशिवाय सॅटेलाईट राईट्स , डिजिटल राईट्स , आणि म्युझिक डीलमधून सुमारे 135 कोटींची कमाई झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा