ताज्या बातम्या

Rajnath Singh On Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याची किती विमान पडली? विरोधकांच्या प्रश्नावर राजनाथ सिंह यांचे प्रत्युत्तर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याची किती विमान पडली? असा प्रश्न उपस्थित केला, यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Published by : Prachi Nate

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून 2 दिवस ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. यावेळी विरोधकांकडून ऑपरेशन सिंदूरवरुन काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ज्यात एक प्रश्न असा होता, ऑपरेशन सिंदूर दरम्यान किती भारतीय विमाने पडली.

याचे उत्तर देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "मला वाटते की त्यांचा प्रश्न आपल्या राष्ट्रीय जनभावनांचे योग्य प्रतिनिधित्व करू शकत नाही. विरोधकांनी एकदाही ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले का? भारतीय सैन्याने शत्रूची किती विमाने पाडली? भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले का? असे प्रश्न जर विरोधकांनी विचारले असते तर त्याच्यासाठी आमचं उत्तर हो असे आहे. पण त्यांनी कोणीच हे प्रश्न उपस्थित केले नाही".

तसेच पुढे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना टोला लगावत म्हटलं की, " जेव्हा ध्येये मोठी असतात तेव्हा आपले लक्ष लहान मुद्द्यांकडे द्यायच नसत, कारण लहान मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्याने देशाची सुरक्षा आणि सैनिकांचा सन्मान आणि उत्साह यासारख्या मोठ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित होऊ शकते, जसे आमच्या विरोधकांसोबत होत आहे".

त्याचसोबत पुढे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "आता विरोधक ऑपरेशन सिंदूरसंदर्भात योग्य ते प्रश्न विचारु शकत नाही आहेत. मगं आता मी त्यांना काय सांगू? आम्ही आता सत्तेत आहोत याचा अर्थ असा नाही की, आम्ही अनंत काळासाठी सत्तेतच राहणार आहोत. अधीक काळ आम्ही देखील सरकारला प्रश्न विचारण्यात घालवला आहे. कोणतीही परिक्षा दिल्यानंतर त्याचा निकाल महत्त्वाचा असतो. एखाद्या मुलाला परीक्षेत चांगले गुण मिळत असतील तर त्याचे गुण आपल्यासाठी महत्त्वाचे असले पाहिजेत. परीक्षा देताना त्याची पेन्सिल तुटली की पेन हरवलं हे महत्त्वाचं नसाव. शेवटी निकाल महत्त्वाचा असतो".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते