गौरव खन्ना बिग बॉस 19 चा विजेता ठरला आहे. जवळपास 20 वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या अनुपमा या मालिकेने गौरव खन्नाला खरी ओळख मिळवून दिली. या मालिकेत गौरवने अनुज कपाडियाची भूमिका साकारली होती. अनुपमा व्यतिरिक्त, गौरव सीआयडी आणि ये प्यार ना होगा काम सारख्या मालिकांमध्येही दिसला आहे. बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर त्याची संपत्ती किती असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…
गौरव खन्ना किती श्रीमंत?
प्रकाशित वृत्तांनुसार, गौरव खन्ना त्याचे वैयक्तिक आयुष्य अतिशय अलिशान पद्धतीने जगतो. अभिनेत्री आकांक्षा चमोलाशी त्याचे लग्न झाले आहे. गौरवच्या ताफ्यात ऑडी A6, रॉयल एनफील्ड असून, त्याची एकूण संपत्ती अंदाजे 8 कोटी ते 15 कोटींच्या दरम्यान आहे. टेलिव्हिजन मालिका, रिअॅलिटी शो, जाहिराती आणि सोशल मीडिया हे त्याचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत.
बिग बॉसमध्ये दर आठवड्याला किती पैसे कमवाले?
बिग बॉस 19 मध्ये, खन्ना या सीझनमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्पर्धकांपैकी एक असल्याचे सांगितले जात असून, गौरवने दर आठवड्याला अंदाजे 17.5 लाख म्हणजेच एका एपिसोडला अंदाजे 2.5 लाख कमवले आहेत. ग्रँड फिनालेपर्यंत त्याची एकूण कमाई 2.62 कोटी होती. अंतिम विजेता ठरल्याने गैरवला 50 लाखांच्या बक्षीस रकमेसह एकूण 3.12 कोटी जिंकले.
अनुपमाच्या तुलनेत 600 टक्क्यांहून अधिक कमाई
रिपोर्ट्सनुसार, गौरव खन्नाचा अनुपमासाठी सुरुवातीला 35 हजार प्रतिदिन मिळत होते. त्यानंतर, बिग बॉस 19 मधील त्याची दैनंदिन कमाई 2.5 लाख झाली, जी अनुपमावरील अनुज म्हणून त्याच्या सुरुवातीच्या कमाईपेक्षा जवळजवळ 614 टक्के अधिक आहे. सुरूवातीच्या 35 हजारांनंतर त्याने अनुपमासाठी 1 ते 2.5 लाख शुल्क आकारले. मलिकांशिवाय गौरव सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये देखील दिसला होता, अंदाजे 2.5 लाख रुपये याशोसाठी त्याला प्रति एपिसोड देण्यात आले.