Asia Cup 2025 : आशिया कप जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफीसह किती पैसे मिळणार?; उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस Asia Cup 2025 : आशिया कप जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफीसह किती पैसे मिळणार?; उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस
ताज्या बातम्या

Asia Cup 2025 : आशिया कप जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफीसह किती पैसे मिळणार?; उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस

Asia Cup 2025 : आशिया कप जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफीसह किती आर्थिक बक्षीस मिळणार, याची घोषणा झाली आहे.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • 9 सप्टेंबरपासून अबुधाबी येथे आशिया कप 2025 स्पर्धेला मोठी उत्सुकता आहे.

  • एकूण आठ संघांनी यात सहभाग घेतला.

  • भारताने सलग विजय मिळवत सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामना 28 सप्टेंबरला रंगणार आहे.

अबुधाबी येथे 9 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आशिया कप 2025 स्पर्धेला मोठी उत्सुकता आहे. यंदा ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जात आहे. एकूण आठ संघांनी यात सहभाग घेतला असून भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, ओमान, यूएई आणि हाँगकाँग हे संघ चषकासाठी मैदानात उतरले आहेत. यामधून भारताने सलग विजय मिळवत सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामना 28 सप्टेंबरला रंगणार आहे.

दरम्यान, विजेत्या आणि उपविजेत्या संघासाठी बक्षीस रकमांची घोषणा झाली आहे. आशिया कप 2025 जिंकणाऱ्या संघाला 2.60 कोटी रुपये आणि ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे. तर उपविजेत्या संघाला देखील 1.30 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळेल. आतापर्यंत भारताने आठ वेळा आशिया कपची ट्रॉफी जिंकली आहे आणि यंदाही भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

भारत सुपर-4 मध्ये दाखल

अ गटात भारताने यूएई आणि पाकिस्तानवर मात करत 4 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे भारताने सुपर-4 फेरीत स्थान निश्चित केले. यूएईने ओमानला हरवून 2 गुण मिळवले असून अजूनही त्यांचा प्रवास सुरू आहे. पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील पुढील सामना गटातून दुसरा संघ सुपर-4 मध्ये कोण असेल, हे निश्चित करणार आहे.

उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक

16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान

17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई

18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान

19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम लढती

20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2

21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2

23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1

24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2

25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2

26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1

28 सप्टेंबर – अंतिम सामना

भारताने कोलंबो येथे झालेल्या आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर मात करत विजेतेपद पटकावले होते. त्या सामन्यात मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी करत चमक दाखवली होती, तर संपूर्ण मालिकेतल्या उत्कृष्ट खेळासाठी कुलदीप यादवला मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार मिळाला होता.

यंदाच्या आशिया कप 2025 मध्ये बक्षीस रक्कम पूर्वीपेक्षा अधिक मोठी आहे. मात्र ही स्पर्धा केवळ पैशापुरती मर्यादित नाही, तर यात प्रादेशिक अभिमान, ऐतिहासिक प्रतिस्पर्धा आणि नवोदित संघांना चमत्कार घडवण्याची संधी दडलेली आहे.

आशिया कप 2025 मध्ये अंतिम टप्प्यापर्यंतची प्रत्येक लढत रोमांचक ठरणार असून, विजेत्या संघाला मिळणाऱ्या ट्रॉफीबरोबरच कोटींचं पारितोषिक हा उत्साह आणखी वाढवणार आहे. आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचे डोळे 28 सप्टेंबरच्या अंतिम सामन्याकडे लागले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा